Sujay Vikhe Patil । सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. काही ठिकाणी उमेदवारांची घोषणा झाली आहे तर काही ठिकाणी उमेदवारांची घोषणा बाकी आहे. दरम्यान अहमदनगर लोकसभा मतदारसंघ देखील चर्चेत आहे. अहमदनगरला भाजपचा उमेदवार मी फिक्स झालो आहे. मात्र समोरचा उमेदवार अजूनही ठरला नाही असा टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
Devendr Fadanvis । ब्रेकिंग! राजकीय घडामोडींना वेग, फडणवीस दिल्लीत दाखल; लवकर होणार मोठा निर्णय
मागच्या काही दिवसापूर्वी भाजपकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीमध्ये भाजपने पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून अद्याप पर्यंत कोणताच उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. यावरून सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. अहमदनगर या ठिकाणी झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यातून त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
Prakash Ambedkar । बिग ब्रेकिंग! निवडणुकीच्या तोंडावरच प्रकाश आंबेडकरांनी केली सर्वात मोठी घोषणा
यावेळी बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी विखे कुटुंबातील चौथ्या पिढीला सत्तेत बसवले आहे. आमचं काहीतरी योगदान असेल त्यामुळेच नागरिकांनी आम्हाला साथ दिली आहे. अहमदनगरला भाजपचा उमेदवार मी फिक्स आहे मात्र समोरचा उमेदवार अजूनही ठरला नाही असे त्यांनी म्हटले आहे.