Sujay Vikhe Patil । सुजय विखेंबाबत ते वक्तव्य करणं मनसे पदाधिकाऱ्याला भोवलं; थेट पदावरून करण्यात आली हकालपट्टी

Sujay Vikhe Patil

Sujay Vikhe Patil । मनसे महायुतीत प्रवेश करण्यासाठी मनसेच्या आणि भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होत आहेत. बंद दाराआड या बड्या नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. मनसे नेते राज ठाकरे आणि भाजपच्या अनेक बड्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच भाजप उमेदवार विरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्याने एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामुळे आता मनसे पदाधिकाऱ्याची त्याच्या पदावरून हाकलपट्टी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Topers Ad

BJP Candidate List । ब्रेकिंग! भाजपनं जाहीर केली चौथी यादी, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळाली संधी

मनसेचे नगरमधील डॅशिंग नेते नितीन भुतारे (Nitin Bhutare) यांनी भाजप उमेदवार खासदार सुजय विखे यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर मनसेने कारवाई करत त्यांना जिल्हा सचिव पदावरून हटवले आहे. महायुतीची अशा कारवाईची महाराष्ट्रातील पहिलीच घटना ठरली आहे. या कारवाईनंतर नितीन भुतारे म्हणाले, “ही कारवाई म्हणजे मी माझे प्रमोशन समजतो” अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Loksabha Elections 2024 । सातारच्या राजकारणात मोठी खळबळ! उदयनराजे भोसले नाराज, दिल्लीत ठोकला तळ

नेमकी काय टीका केली होती नितीन भुतारे यांनी?

भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी सुजय विखे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “सुजय विखे पाटील यांनी कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधल्याचे मला दाखवून द्या आणि एक हजार रुपये बक्षीस घेऊन जा.. सुजय विखे पाटील हे सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत.. जर कोणाला त्यांच्याशी भेट घ्यायची असेल तर खूप प्रयत्न करावे लागतात… तरी देखील संपर्क होत नाही” अशी टीका केली होती.

Ajit Pawar । सुप्रिया सुळेंबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट

मनसेचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतारे यांनी वरिष्ठ पदाधिकारी यांना विचारात न घेता हे वक्तव्य केले. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी आल्या होत्या त्यामुळे त्यांना पक्षातील पदावरून हटवले असून त्यांच्या जागी संजय शेळके यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai News । धक्कादायक बातमी! वडिलांचा पीएफ मागितल्यावर कंपनीच्या एचआरने मुलीकडे केली सेक्सची मागणी

पक्षाने कारवाई केल्यानंतर नितीन भुतारे काय म्हणाले?

पक्षाने कारवाई केल्यानंतर नितीन भुतारे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईबाबत ते म्हणाले, ही कारवाई म्हणजे मी माझे प्रमोशन समजतो. मी पक्ष सोडला नसून मला पक्षाने पदावरून हटवले आहे. कारण खरे बोललो म्हणून भाजपला ते झोंबले. मी राज ठाकरे यांच्याबरोबर आजही आहे. असे ते म्हणाले आहेत.

Spread the love