मुबंई | नुकतेच महा पशुधन एक्स्पो 2023 च्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काही नेते आणि कलाकारही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात गायक सुदेश भोसले यांनी काही गाणी गाऊन रसिकांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
साऊथचा हिरो अल्लू अर्जुनची संपत्ती पाहून डोळे पांढरे होतील
एका कार्यक्रमात भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी कॉमेडियन गौरव मोरे आणि गायक सुदेश भोसले यांच्यासोबत ‘वन टू का फोर’ आणि ‘मैं हूं डॉन’ या गाण्यांवर डान्स केला. त्याच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुजय विखे यांनी नाचायला सुरुवात करताच आजूबाजूचे लोकही मस्तीत सामील झाले. गौरवनं हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे.
जय श्रीरामचा गजर, बुलेट स्वारी अन् नवनीत राणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
‘महाराष्ट्र लाफ्टर फेअर’ फेम गौरव मोरेने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. अनेक कार्यक्रमांमध्येही तो दिसतो. ‘महाराष्ट्र लाफ्टर फेअर’मधून गौरवला विशेष लोकप्रियता मिळाली. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात तो लोकांचं मनोरंजन करताना दिसत आहे.
सलमान-शाहरुख ‘या’ कारणाने येणार आमने सामने
गौरव मोरे आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या शोनं लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचे खूप मनोरंजन केले. आजही प्रेक्षकांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. हास्यजत्रेचं सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते.