Sumit Raghavan : मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नसल्याने सुमीत राघवनने पोस्ट शेअर करत केला संताप व्यक्त

Sumeet Raghavan shared the post and expressed his anger as Marathi films are not getting theatres

मुंबई : गेल्या काही दिवसापासून विविध मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यानंतर आता डॉ. सलील कुलकर्णी (Salil Kulkarni) दिग्दर्शित ‘एकदा काय झालं!!’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये सुमीत राघवन आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे (Urmila Kothare) मुख्य भूमिकेत आहेत. पण चित्रपटाला शो न मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला आहे. आता सुमित राघवनने (Sumit Raghavan) देखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

नुकतंच सुमीतने ट्विटरवर आणि फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने मराठी चित्रपट आणि त्याला मिळणारे शो याबद्दल भाष्य केले आहे. फेसबुकवर पोस्ट शेअर करत सुमितने लिहिले की, ९३ वर्षांच्या मोहनदास सुखटणकर काकांनी काल suncity ,विले पार्ले येथे #एकदाकायझालं बघितला आणि त्यांचा गहिवरून फोन आला. ते म्हणाले,माझा मुलगा आणि सून,मला हाताला धरून फिल्मला घेऊन गेले. अडीच वर्षांनी मी चित्रपटगृहात गेलो आणि त्याचं सार्थक झालं. ते म्हणाले, चित्रपटाचा एवढा परिणाम होता की घरी आल्यावर मी १५ मिनिटं घेतली स्थिर व्हायला. ते पुढे म्हणाले, ह्या फिल्मचा हँगओव्हर इतक्यात जाणार नाही. हे सगळं ऐकल्यावर,त्यांना भेटलो ,त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. ही झाली आमच्या काकांची गोष्ट.

आता दुसरी गोष्ट म्हणजे,९३ व्या वर्षी जर आमचे काका चित्रपटगृहात जाऊन आमची फिल्म बघू शकतात तर मग “अरे ott वर आल्यावर बघू किंवा टीव्ही वर बघू” असा विचार नका करू. तुम्ही जर थिएटर मध्ये नाही आलात तर आमचे shows कमी होतील आणि हा पिक्चर सर्वांपर्यंत नाही पोहोचणार. मान्य आहे,मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाहीत पण तुम्ही आलात तर थिएटर्स ना शो लावण्याशिवय पर्याय नाही उरणार.

नंतर पुढे ट्विट करत सुमितने लिहिले की, काल आमच्या चित्रपटावरच्या एका पोस्ट मध्ये एक वाक्य लिहिलं होतं की “जिथे पिकतं तिथे विकत नाही”. आज एक आठवडा झाला #EkdaKaayZala प्रदर्शित होऊन आणि मुंबईत जेमतेम ३ shows आहेत,एक ठाण्याला आहे,महाराष्ट्रात अनेक ठिकाणी एकही शो नाहीये. हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जाताना दिसतोय.

दरम्यान सुमीतच्या या पोस्टवर नेटकरी वेगेवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. यामध्ये खास बाब म्हणजे मराठी चित्रपटांना थिएटर्स न मिळणे, प्राईम टाईम या मुद्द्यावर अनेक कलाकारांनी याआधी देखील संताप व्यक्त केला होता. गेल्या काही दिवसांपासून याच मुद्द्यावर सातत्याने कलाकार टीका करताना दिसत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *