Sharad Pawar । महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय खेळी खेळली गेल्याची शंका व्यक्त होत आहे. या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा फेरबदल पाहायला मिळू शकतो, असे मानले जात आहे. वास्तविक, याचे कारण अजित पवार गटाच्या नेत्यांच्या शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठका आहेत.
Maharashtra Politics । छगन भुजबळ शरद पवारांना का भेटले? भाजप नेत्याचा धक्कादायक दावा
सोमवारी (१५ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली, तर आज अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्या.
Pooja Khedkar । IAS पूजा खेडकरच्या आईची दादागिरी, शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक; व्हिडिओ व्हायरल
अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आज पुण्यातील मोदी बागेत पोहोचल्या. खासदार सुनेत्रा पवार तासाभराहून अधिक काळ मोदी बागेत थांबल्या. त्यावेळी मोदी बागेत शरद पवारही उपस्थित होते.