Sunil Kamble । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजप आमदाराच्या चांगलचं भोवलं आहे. आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता आमदार कांबळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Sharad Mohol । ब्रेकिंग! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात
शुक्रवारी सोशल मीडियावर भाजप आमदार सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर विरोधकांनी देखील सरकारवर निशाणा साधला. ऑन ड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हात उचलण्याची हिंम्मत झालीच कशी? , असा सवाल देखील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
त्याचबरोबर याची दखल गृहमंत्री घेणार का? या प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हणाले होते. दरम्यान, यानंतर पुणे पोलिसांनी आमदार कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
Aditya Thackeray । आदित्य ठाकरे यांनी केला सर्वात मोठा खळबळजनक दावा!