
Sunil Kedar । नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात त्यांचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्यासह पाच जणांना शुक्रवारी दोषी ठरवण्यात आले. दरम्यान आता सुनील केदार (Sunil Kedar) यांना बँक घोटाळा (Nagpur Bank Scam) प्रकरणी तुरुंगवास झाल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे.
सावनेर विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक घेतली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात देखील याबाबत चर्चा रंगल्या आहेत. प्रशासनीक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे पुढील आठवड्यात यासंदर्भात काही हालचाली होण्याची शक्यता आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरण नेमकं काय आहे?
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एनडीसीसीबी) निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री सुनील केदार यांना येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी जे.व्ही.पेखळे-पूरकर 2002 प्रकरणी हा निकाल दिला आहे. केदार यांना इतर तरतुदींसह भारतीय दंड संहितेच्या कलम 409 (लोकसेवकाने विश्वासाचे गुन्हेगारी उल्लंघन) अंतर्गत दोषी ठरवले. फिर्यादीनुसार, NDCCB ला सरकारी रोख्यांमध्ये 125 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 2002 मध्ये, गुंतवणूक फर्म होम ट्रेड सिक्युरिटीजद्वारे पैसे गुंतवताना नियमांचे उल्लंघन केले गेले. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते.