Sunil Kedar । माजी मंत्री सुनील केदार यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. सुनील केदार यांचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे सुनील केदार यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. हा घोटाळा मोठा आहे. रक्कमही मोठी आहे त्यामुळे जामीन नाकारल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल आहे.
माहितीनुसार, जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर नागपूर मेडिकल रुग्णालयामध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत. सुनील केदार यांना मायग्रेनचा आणि घशाच्या संसर्गाचा त्रास असल्याने त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
Accident । बस आणि डंपरचा भीषण अपघात! २ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू तर २० गंभीर प्रवासी जखमी
सुनील केदार यांना मागच्या काही दिवसापासून धक्क्यावर धक्के बसत आहेत,. पाच वर्षाची शिक्षा झाल्यामुळे त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर, जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन अर्ज देखील फेटाळला आहे. त्यामुळे आता सुनील केदार यांना हायकोर्टाचे दार ठोठावे लागणार आहे. हायकोर्टात देखील दिलासा मिळाला नाही तर सुनील केदार जामीन मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
AI Death Calculator । काय सांगता? आता AI सांगणार मृत्यू कधी होणार, कसं ते जाणून घ्या