Sunil Kedar । नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. आता याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. माजी मंत्री सुनील केदार यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन अर्ज मंजूर झाला आहे. एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत माहिती अशी की, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. यानंतर जामीन मिळावा म्हणून सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज सुनावणी पार पडली असून त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना दिला सर्वात मोठा इशारा
माहितीनुसार, सुनील केदार यांना एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. यामुळे सुनील केदार यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
Sharad Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! शरद पवार निवृत्ती घेणार? निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य