Nagpur District Bank Scam । सर्वात मोठी बातमी! नागपूर जिल्हा बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी काँग्रसचा बडा नेता दोषी

Nagpur District Bank Scam

Nagpur District Bank Scam । नागपूर : 2002 मध्ये नागपूर जिल्हा बँकेत (Nagpur District Bank) तब्बल 150 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यावेळी या बँकेचे अध्यक्ष काँग्रसचे नेते आणि माजी मंत्री सुनिल केदार (Sunil Kedar) होते. बहुप्रतीक्षित असणाऱ्या या नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील (Nagpur District Bank Scam in 2002) खटल्याचा निकाल आज लागला आहे. सर्वांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. (Latest Marathi News)

Accident News । बस-दुचाकीचा भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू

न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देत सुनील केदार( तत्कालीन बँक अध्यक्ष), अशोक चौधरी (तत्कालीन बँक मॅनेजर) (Ashok Chaudhary) आणि केतन शेठ (मुख्य रोखे दलाल) (Ketan Sheth) या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा सहा जणांना दोषी ठरवले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे राजकीय वर्तुळात आता एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस (Congres) या पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Salman Khan । हे काय? सलमानने अभिषेकला मारली मिठी, नेटकरी म्हणाले, “ऐश्वर्या राय…”

दरम्यान, सुनील केदार या बँकेचे अध्यक्ष असताना बँकेच्या रकमेतून 2001-02 मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स लि. आणि इतर काही कंपन्यांकडून सरकारी प्रतिभूती खरेदी केल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे सहकार विभागाच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही गुंतवणूक झाली होती. खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे खूप पैसे बुडाले होते. त्यामुळे केदार यांच्यासह इतर काही जणांवर गुन्हे नोंदविले होते.

Corona Update । प्रशासनाचे धाबे दणाणले, झपाट्याने पसरतोय कोरोना; मुंबईत पुन्हा मास्क वापरण्याचा सल्ला

Spread the love