
मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव चांगलेच वाढले (Tomato Price Hike) आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. परंतु याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. टोमॅटोच्या किमती (Tomato Price) वाढल्याने सर्वसामान्यांच्या ताटात आता टोमॅटो दिसत नाही. यावर बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांनी देखील टोमॅटो खायला परवडत नसल्याचे म्हटले होते. त्यावरून त्यांना आता राजकीय वर्तुळातून टीकेचा सामना करावा लागत आहे. (Latest Marathi News)
सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवले नाहीतर २६/११ सारखा हल्ला केला जाईल; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
“जर टोमॅटो खाल्ला नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही. टोमॅटोचे भाव वाढले असल्याने सुनील शेट्टीने हा जागतिक विषय केला आहे. जर टोमॅटोच्या किमती वाढल्या असतील तर सुनील शेट्टीने तो खाऊ नये, परंतु शेतकऱ्यांची चेष्टा करू नये. चार वर्षातून शेतकऱ्यांना काही पैसे मिळतात. परंतु हे शहरी लोक त्याचे भांडवल करतात. मला त्यांच्या बुद्धीची कीव येते”, अशा शब्दात शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सुनील शेट्टींना खडे बोल सुनावले आहे. तसेच सुनील शेट्टी यांच्यावर शेतकरी आणि नेटकऱ्यांनीही निशाणा साधला आहे.
Ajit Pawar | अजित पवार यांची वंदे भारत ट्रेनमध्येही क्रेझ कायम, कार्यकर्त्यांनी केली प्रचंड गर्दी
“टोमॅटोला कधीतरी चांगले दर मिळायला लागले आहेत तर तुमच्या सारख्या जागतिक भिकाऱ्याच्या पोटात दुखायला लागले आहे. सुनील शेट्टी तुम्ही सिने कलावंत नाही तर बाजारू कलावंत आहात. जर सडक्या विचाराचा सुनील शेट्टी भिक मागायला आला तर त्याला सडके टोमॅटोच द्या”, अशी टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे.