Maharashtra Politics । राज्यात अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. जसजशा निवडणुका जबल येतील तसतशा राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी करताना दिसत आहेत. अनेक दिग्ग्ज नेते, पदाधिकारी पक्षांतर करत आहेत. अशातच आता अजित पवार गटातील (Ajit Pawar Group) नेते, मंत्री भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Latest marathi news)
Ghazipur News । अतिशय भीषण अपघात! लग्नाला चाललेल्या बसवर पडली हायव्होल्टेज विजेची तार
काँग्रेस नेते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी एक खळबळजनक ट्विट केले आहे. “धोके पे धोका, ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपाने ठगा नही! सुनिल तटकरे (Sunil Tatkare), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार”, असा दावा अतुल लोंढे यांनी एक्स माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये केला आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार आहे! अजित दादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहतील,” अशाही आशयाचे ट्वीट अतुल लोंढे यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खूप मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
Nilesh Lanke । शरद पवार गटात जाणार का? स्वतः आमदार निलेश लंके यांनी दिल स्पष्टीकरण