Sunny Deol । मद्यधुंद अवस्थेत सनी देओल मुंबईच्या रस्त्यावर; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Sunny Deol

Sunny Deol । सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होण्यासाठी जास्त कालावधी लागत नाही. अगदी काही क्षणातच सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ किंवा इतर माहिती व्हायरल होत असते. यामध्ये जर एखादा प्रसिद्ध व्यक्ती असेल किंवा सेलिब्रेटी असेल त्यांचे तर व्हिडिओ, फोटो किंवा त्यांच्या बाबत अन्य माहिती सोशल मीडियावर काही सेकंदातच व्हायरल होत असते. सध्या देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol Viral Video) आहे.

Gold Silver Rate Today । खरेदीची ‘सुवर्ण’ संधी! सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, पहा नवीनतम दर

या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सनी देओलची अवस्था पाहून चाहते काळजी व्यक्त करत आहेत. कारण मुंबईमधील जुहू सर्कल परिसरामध्ये सनी देओल चक्क मध्यधुंद अवस्थेत पाहायला मिळाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो रस्त्याच्या मधोमध अडखळत चालतोय आणि अचानक एक रिक्षा चालक त्याच्या मदतीला येतो. रिक्षा चालक सनी देवलला त्याच्या रिक्षामध्ये बसवतो आणि हे सर्व घडत असताना तो मध्यधुंद अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Viral News । कुत्रा बनण्यासाठी एका व्यक्तीने खर्च केले तब्बल 12 लाख रुपये, कारण वाचून बसेल धक्का

सनी देओलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘सनी पाजी मध्यधुंद अवस्थेत रस्त्यावर का फिरत आहेत?’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘कदाचित हा डीपफेक व्हिडिओ असू शकतो’ अशा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी या व्हिडिओवर देत आहेत.

Cyclone Michong । मिचॉन्ग गेला पण प्रभाव कायम, 17 मृत्यू, वीज गायब, पाणी साचले, चेन्नईची परिस्थिती अजूनही भयानक

Spread the love