आज 22 ऑक्टोबरपासून (शनिवार) T20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 12 टप्पा सुरू होत आहे. दरम्यान पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनी येथे होणार आहे. तसेच 23 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध (भारत विरुद्ध पाकिस्तान) पहिला सामना खेळणार आहे. दरम्यान सुपर-12 टप्प्यात, 22 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात दिवसाचा दुसरा सामना खेळला जाईल.
विशेष या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होत आहेत. सुपर-12 फेरीसाठी 8 संघ आधीच उपस्थित होते, तर पात्रता फेरीतील 4 संघ नेदरलँड्स, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि श्रीलंका यांनीही सुपर-12 मध्ये स्थान मिळवले आहे. दरम्यान श्रीलंका आणि आयर्लंडने ग्रुप-1 मध्ये प्रवेश केला आहे, तर झिम्बाब्वे आणि नेदरलँडने ग्रुप-2 मध्ये प्रवेश केला आहे.
सुपर – 12 गट
गट-1: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि आयर्लंड.
गट-2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड, झिम्बाब्वे.
तरुणांनो मनसोक्त दारु प्या! ‘या’ सरकारचे आगळेवेगळे आवाहन; वाचा सविस्तर
सुपर-12 टप्प्यात भारताविरुद्ध सामने
23 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना मेलबर्न येथे दुपारी 1:30 वाजता सुरू होणार आहे. तसेच 27 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध नेदरलँड हा सामना सिडनी येथे दुपारी 12:30 वाजता होणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना पर्थ येथे दुपारी 4:30 वाजता सुरू होणार आहे. पुढे 2 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना एडिलेड येथे दुपारी 1:30 वा सुरू होणार आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना मेलबर्न येथे दुपारी 1:30 वाजता होणार आहे. दरम्यान भारत आपल्या मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल.
नेहाची पुन्हा एन्ट्री होणार? ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत नेहाचा नवा लूक चर्चेत