Mia Khalifa । इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा (Israel vs Palestine) संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. हमास आणि इस्रायल हल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहेत. यावर अनेकजण आपले मत मांडत आहेत. या हल्ल्यात अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या युद्धाबाबत मॉडेल, अभिनेत्री मिया खलिफाने एक ट्विट (Mia Khalifa Tweet) केले होते. परंतु तिला आता हे ट्विट चांगलेच महागात पडले आहे. (Latest Marathi News)
“तुम्ही पॅलेस्टाईनमधील सध्याची परिस्थिती पाहत असाल आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या बाजूने नसाल तर तुम्ही भेदभाव करत आहात. योग्य वेळ येताच इतिहास ही गोष्ट दाखवेल.” असे मिया खलिफाने ट्वीट केले आहे. त्यावरून तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. परंतु हे प्रकरण येथे थांबले नाही. तिला या वक्तव्यावरून नोकरी गमवावी लागली आहे.
Shivsena । शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह ठाकरेंना मिळणार का? आज होणार महत्त्वपूर्ण सुनावणी
मिया खलिफाला रेड लाईट हॉलंडचे (Red Light Holland) सीईओ टॉड शापिरो (Todd Shapiro) यांनी नोकरीवरुन तडकाफडकी काढून टाकले आहे.ही कंपनी अमेरिकेसह युरोपमध्ये मशरुम होम ग्रो किटचे उत्पादन करून त्याची विक्री करते. महत्त्वाचे म्हणजे यावर्षीच्या सुरुवातीलाच कंपनीने तिला फर्ममध्ये घेतले होते. परंतु आता मियाला तिची नोकरी गमवावी लागली आहे. ट्विटनंतर सीईओने तिच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट संपवून तिचे चॅनल डिलीट केलं आहे.
Washim crime । महाराष्ट्र हादरला! पेट्रोल ओतून झेडपी शिक्षकाला जिवंत जाळलं, नेमकं कारण काय?