अदानी हिडेंनबर्ग प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी; सेबीला दिले महत्त्वाचे आदेश

Supreme Court Hearing on Adani Hidenburg Case; Important orders given to SEBI

हिडेंनबर्गने प्रसिध्द केलेल्या अहवालानंतर अदानी समूहाला (Adani Group) उतरती कळा लागली आहे. दरम्यान हिंडेनबर्ग-अदानी प्रकरणात सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने भारतीय गुंतवणूकदारांना ( Indian Investers) झालेल्या नुकसानाबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या हितासाठी व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून सेबीकडून सुचना मागवण्यात आल्या आहेत. तसेच लवकरच याप्रकरणी तज्ज्ञ समिती नेमली जाणार आहे.

अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर सणसणीत टीका; म्हणाले, “हे निर्णयशून्य सरकार….”

काल झालेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी गुंतवणूकदारांच्या नुकसानाबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, “भारतीय गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 10 लाख कोटींचे नुकसान झाले असल्याचे म्हटले जाते. भविष्यात असे काही होणार नाही, याची खात्री आम्ही कशी करावी ? यावर सेबीची भूमिका काय असणार?

बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देताच भाजपने दिली खुली ऑफर!

तसेच आम्ही एक तज्ज्ञांची समिती नेमू शकतो. या समितीमध्ये गुंतवणूक तज्ज्ञ, सिक्युरीटी एक्सचेंजमधील अनुभवी, माजी न्यायमूर्ती यांचा समावेश असू शकतो. सध्या मध्यमवर्गीय लोक देखील गुंतवणूक करत आहेत. असेही खंडपीठाने आजच्या सुनावणी मध्ये म्हटले आहे. अर्थ मंत्रालय, सेबी आणि संबंधितांशी चर्चा करून आम्हाला त्याची माहिती द्यावी असे सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितले आहे.

राहुल कलाटे यांना बंडखोरी पडणार महागात! शिवसेनेतून हाकलपट्टी होण्याचे संकेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *