Rakhi Sawant । बॉलिवूडची अभिनेत्री राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी येत असते. अनेकदा तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. सोशल मीडियावर (Social media) तिचे चाहते खूप आहेत. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राखी सावंतला मोठा धक्का दिला आहे. तसेच न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Loksabha Election । लोकसभेत भाजपने उघडलं विजयाचं खातं, ‘या’ मतदारसंघात उधळला गुलाल
राखी सावंतला पूर्वाश्रमीचा पती आदिल दुर्रानी (Adil Durrani) याचे अश्लिल व्हिडिओ सार्वजनिक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या वादग्रस्त अटकपूर्व जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुढील चार आठवड्यात आत्मसमर्पण करा, असे महत्त्वाचे निर्देश देखील न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
Jitendra Awhad । बिग ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड बिष्णोई गँगच्या निशाण्यावर, लाखोंची मागणी करत…
दरम्यान, आदिल दुर्रानीने गुन्हा दाखल केल्यानंतर राखी सावंतने उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. पण न्यायालयाने तिला दिलासा दिला नव्हता. त्यानंतर ती दुबईत वास्तव्याला गेली. राखी सावंतने दुर्रानीसोबत लग्न झाल्याचा दावा डिसेंबर 2022 मध्ये केला होता. राखीने काही दिवसानंतर आदिलवर हिंसाचार आणि छळवणुकीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर आदिलला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
Sharad Pawar । भरसभेत शरद पवारांनी मान्य केली चूक, म्हणाले; “पाच वर्षांपूर्वी केलेल्या चुकीची माफी…”