Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार गटाला सर्वात मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश

Sharad Pawar

Sharad Pawar । नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) अजित पवार यांचा गट (Ajit Pawar group) खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच पक्षाचे चिन्ह देखील अजित पवार गटाला दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवार गटाला (Sharad Pawar group) खूप मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. (Latest marathi news)

Indapur News । अक्षय साळुंखे यांची राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष इंदापूर तालुक्यासाठी निवड

आज या याचिकेवर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी प्रथम युक्तिवादाला सुरुवात केली. त्यांनी कोर्टाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. या मागण्या सुप्रीम कोर्टाने मान्य केल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने आता निवडणूक आयोगाला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. तसेच अजित पवार गटाला उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Pune Crime News । पुणे हादरले! शुल्लक कारणावरून मोठा वाद; चारचाकी पेटवली, महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकले अन्…

अजित पवार गटाला या प्रश्नाची उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यानंतर होणार आहे, असंही कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेलं तात्पुरतं नाव निवडणुकीपर्यंत कायम ठेवा. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हेच नाव निवडणुकीपर्यंत राहू द्या, अशी विनंती मनु सिंघवी यांनी केली. शरद पवार गटानं चिन्ह मागितल्यानंतर त्यांना एक आठवड्यात चिन्हं देण्यात यावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले.

Hemant Godse Car Accident । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात

Spread the love