महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. या निकालात माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagat sinh Koshyari) यांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. शिंदे- फडणवीस सरकार स्थापन होत असताना राज्यपालांनी घेतलेले निर्णय चुकीचे आहेत. असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.
मोठी बातमी | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आम्ही समाधानी ; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
राज्यपालांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणीचा आदेश देणे बेकायदेशीर होतं. त्यावेळी राज्यपालांसमोर कोणतेही सबळ पुरावे नव्हते. परंतु, उद्धव ठाकरेंना आता पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही कारण उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे न जाताच त्यांनी राजीनामा सुपूर्द केला होता. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे शिंदे- फडणवीस सरकार स्थापन होण्यासाठी संमती देण्याचा राज्यपालांचा निर्णय योग्य ठरतो.
राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना भगतसिंग कोशारी यांच्या भूमिका कायद्याला धरून नव्हत्या. राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय देणे बेकायदेशीर होते. असे मत न्यायमूर्ती धनंजय चंद्रसूड यांनी मांडले आहे. सत्तासंघर्षाच्या आजच्या निकालानंतर आता १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.