Site icon e लोकहित | Marathi News

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुप्रिया सुळे आक्रमक; म्हणाल्या, “हे सरकार…”

Supriya Sule Aggressive on farmers' questions; Said, "This government..."

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या पालेभाज्या, फळपिके याचे आतोनात नुकसान झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कांदा देखील शेतकऱ्यांना रडवताना दिसत आहे. या सर्वामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“बिबट्या घुसला थेट घरात अन्…”, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यामध्ये अवकाळी पाऊस होत असताना राज्यकर्त्यांनी होळी खेळण्यातून वेळ काढला असता तर शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर झाले असते. मात्र हे सरकार असंवेदनशील आहे. अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

धक्कादायक! अवकाळी पावसामुळे शेतात गव्हाचे पीक पडले आडवे; चिंताग्रस्त शेतकऱ्याने केली आत्महत्या

त्याचबरोबर सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “सरकारने अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या आहेत मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहता या घोषणा प्रत्यक्षात येणार आहेत का? अशा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

रामदास कदम यांना मोठा धक्का! जवळच्या माणसावर ईडीची मोठी कारवाई

Spread the love
Exit mobile version