Supriya Sule | शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नुकतीच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केसरकारांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. “अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन आहे” असे गमतीशीर उत्तर त्यांनी दिले आहे.
Monsoon 2023 । बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी! राज्यात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन
“अजित पवार कार्यक्षम नेते आहेत, त्यांच्या कामाचा फायदा राज्याला झाला पाहिजे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षात काय होत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे,” असं केसरकरांनी म्हटले होते. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबईत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “अमिताभ बच्चन हे सर्वच सिनेमात हवे असतात. त्यांचा आवाज, फोटो, लूक आणि सही सुद्धा चालते. तसेच, अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन असून त्यात चुकीचं काय आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
Monsoon 2023 । बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी! राज्यात ‘या’ दिवशी होणार मान्सूनचे आगमन
तसेच पुढे त्या म्हणाल्या, ” राज्यात करोडो रुपयांच्या जाहिराती कोण देत आहे, याचा शोध मी आणि अजित पवार घेत आहोत. परंतु अजूनही कोणताच हितचिंतक आम्हाला मिळाला नाही. असा हितचिंतक सापडला तर तुमचे आणि आमचेही भले होईल. जर तुम्हाला असे हितचिंतक सापडले तर त्यांना आमचा फोन नंबर द्यावा, असा टोला राज्य सरकारला त्यांनी हाणला आहे.
जर सत्तेत असणारे नेते जाहिराती आणि बॅनरबाजी करत असल्यास राज्याचे काम कुठे चाललले आहे ते यावरून दिसत आहे. महिलांच्या सुरक्षेकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे अशी टीका सुळे यांनी केली.