राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कायम चर्चेत असतात. एक यशस्वी महिला खासदार म्हणून सुप्रिया सुळे यांची ओळख आहे. त्या कायम लोकांच्या मदतीसाठी धावून येत असतात. दरम्यान, सुप्रिया सुळे यांना आवडता चित्रपट कोणता असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना सुप्रिया सुळेंनी मिर्झापूर या वेब सिरीजचं नाव घेतलं.
ऊसतोड मजूर नवरा-बायको रातोरात इंस्टाग्रामवर झाले स्टार
सुप्रिया सुळे यांनी मिर्झापूरमधील अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. त्याचबरोबर त्या पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाला इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी डायरेक्ट मित्रमंडळींकडून पंकज त्रिपाठी यांचा नंबर घेऊन पंकज त्रिपाठी यांना पर्सनल मेसेज केला.
“…म्हणून आफताबने दाबला होता श्रद्धाचा गळा”; अखेर हत्येचे कारण झाले उघड
आपल्याशी बोलण्यासाठी योग्य वेळ काय आहे? असा सुप्रिया सुळे यांनी पंकज त्रिपाठी यांना मेसेज त्यांनी केला होता. त्यांच्याशी बोलण्याचा आनंद पाहण्यासारखा होता. तुम्ही अप्रतिम अभिनय केला आहे असं सुप्रिया सुळे त्यांना म्हणाल्या.
दौंड हत्याकांडाचे गूढ वाढले; पुरलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढले
सुप्रिया सुळेंनी केलेलं एवढे कौतुक ऐकल्यानंतर त्रिपाठी आभार मानताना म्हणाले की, मी बारामतीला येऊन गेलोय. असं म्हणताच सुप्रिया सुळे आश्चर्यचकित झाल्या. तुम्ही बारामतीला येऊन गेलात आणि मला माहितीही नाही. यावर त्रिपाठी म्हणाले की, हो मी आलो होतो बारामतीला. यांनतर सुप्रिया सुळे म्हणाल्या पुन्हा कधी आपल्यावर आपण नक्की भेटू.
ब्रेकिंग! अचानक तब्बेत बिघडल्याने अभिनेते अन्नू कपूर रूग्णालयात दाखल