राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Nationalist Congress MP Supriya Sule) हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या मेट्रोच्या कामामध्ये तांत्रिक चुका असल्याचा मोठा दावा केला आहे. यासाठी सुप्रिया सुळे यांनी काही अभियंत्यांनी लिहिलेल्या पत्रांचा आधार घेतला आहे.
सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार? काँग्रेसच्या अधिवेशनात केली मोठी घोषणा
त्याचबरोबर या कामाचे ऑडिट करण्यात यावे आणि या चुका दुरुस्थ करण्यात अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांनी उद्घाटन केलेल्या पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गादरम्यान बांधकामाच्या काही गंभीर तांत्रिक त्रुटी राहिल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंत्यांचे म्हणणे आहे.या मार्गावरुन भविष्यात लाखो प्रवासी दररोज प्रवास करणार आहेत.”
“कोयत्याने डोक्यावर घाव करताना…”, एमसी स्टॅनने केला ‘त्या’ थरारक घटनेबद्दल मोठा खुलासा
प्रधानमंत्री मा. नरेंद्रजी मोदी यांनी उद्घाटन केलेल्या पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे कॉलेज या मार्गादरम्यान बांधकामाच्या काही गंभीर तांत्रिक त्रुटी राहिल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंत्यांचे म्हणणे आहे.या मार्गावरुन भविष्यात लाखो प्रवासी दररोज प्रवास करणार आहेत. pic.twitter.com/gOTVsf638F
— Supriya Sule (@supriya_sule) February 25, 2023
त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या की, “लाखो प्रवासी दररोज प्रवास करणार आहेत. त्यांची सुरक्षितता लक्षात घेता या संपूर्ण बांधकामांचे तातडीने ‘स्ट्रक्चरल ऑडीट’ करुन या त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. माझी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रजेश दिक्षित यांना विनंती आहे की कृपया याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करावी.”