Supriya Sule । आज अनेक खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. कालच्या निलंबनावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडले होते. आजही आणखी ४९ खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे. आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा समावेश आहे. आतापर्यंत 141 खासदारांना दोन्ही सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
Congress । काँग्रेसला मोठा धक्का! या आमदाराने दिला तडकाफडकी राजीनामा
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “आपण लोकशाहीतून निवडून आलो आहोत. पण अत्याचार सुरू झाले. आतापर्यंत 100 हून अधिक खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना कोणताही विरोध नको होता, त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली. आम्ही सरकारमध्ये असताना असे कधी केले नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन या हल्ल्याबाबत निवेदन द्यावे आणि त्यावर चर्चा व्हावी.
पण सरकारला चर्चा करायची नाही, अत्याचार होत आहेत. तसेच आजचा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस आहे, लोकशाहीचा आवाज दाबण्याचे पाप आज दिल्लीत केले जात आहे.” विरोधी पक्षाला हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Sharad Pawar | 141 खासदारांच्या निलंबनावर शरद पवारांनी दिली संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले…
संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा तापला
वृत्तानुसार, संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून आज विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडले. संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ सुरू केला. लोकसभेत सभापतींचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर, सपा खासदार डिंपल यादव आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावांचा समावेश आहे.
आज लोकसभेतून 41 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच आतापर्यंत दोन्ही सभागृहातील 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे.