
Supriya Sule Paramotoring । खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जेजुरी या ठिकाणी पॅऱामोटोरिंग या सहासी खेळाचा आनंद लुटला आहे. सुप्रिया सुळे यांनी यामध्ये बसून उड्डाण केल्यानंतर सुमारे १००० फुटावरून त्यांनी जेजुरी गडाचे विहंगम दृश्य अनुभवला आहे. यानंतर सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे या म्हणाल्या, या अनोख्या तंत्रज्ञानाचा प्रयोग प्रचंड आनंद देऊन गेला. सुमारे दहा मिनिटे त्यांनी हा सहासी खेळाचा आनंद लुटला असल्याची माहिती दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रिया सुळे यांनी जेजुरी गडाचे आकाशातून दर्शन घेतले. जेजुरी या ठिकाणच्या फ्लाईंग रायनो पॅऱामोटोरिंग अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 800 ते 1000 फूट उंचीवरून जेजुरी गडाच्या दर्शनाचा आनंद घेतला आहे. (Supriya Sule Paramotoring)
Pune Crime । धक्कादायक! झोपमोड केल्याने भाडेकरुने केली घरमालकाची हत्या
पॅऱामोटोरिंग म्हणजे नेमकं काय? (What exactly is paramotoring?)
पॅऱामोटोरिंग हा एक सहासी खेळाचा प्रकार असून यामध्ये पॅऱाग्लायडिंगप्रमाणे मागे सेल असते आणि पुढे दोन व्यक्तींना बसण्याची जागा असते. याला दोन मोटर्स बसवलेल्या असून याच्या साह्याने आकाशातून सैर करता येते. यामध्ये मोटरचा वापर करण्यात आला असल्यामुळे त्याला पॅऱामोटोरिंग असं म्हटलं जातं.