राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांच्याबाबतीत एक धक्कादायक घटना घडली. हिंजवडी येथील कराटे क्लासेसच्या उद्घाटनासाठी त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे प्रमुख पाहुण्या होत्या. दरम्यान उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करत असताना सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागली. उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीच्या निदर्शनास येताच लगेचच ही आग विझवण्यात आली. आता यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप खासदार बृजभूषण संभाजी महाराजांबद्दल बोलताना चुकले; म्हणाले…
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “थोडस दुर्देव होतं बाकी काही नाही. थोडक्यात वाचले, पुण्यात कार्यक्रमावेळी त्या ठिकाणी मेनबत्ती होती. त्यामुळे माझ्या साडीने लगेचच पेट घेतला. मात्र मला पुढे भरपूर कार्यक्रम होते त्यामुळे कपडे बदलायला वेळ मिळाला नाही.” अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
मोठी बातमी! पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीला आग
दरम्यान, या घटनेत सुदैवाने सुप्रिया सुळे ( Supriya sule in trouble) यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. सुप्रिया सुळे यांनी स्वतः सर्वांना शांत करत काळजी घेण्याचे आवाहन केले.
मोठी बातमी! दिग्गज अभिनेते अशोक सराफ देताहेत ‘या’ गंभीर आजाराशी झुंज