संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ होताच सुप्रिया सुळे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “माझ्या संपत्तीची…”

Supriya Sule reacts as wealth increases by 173 percent; Said, "My wealth..."

ADR ने नेत्यांच्या संपत्तीबाबत एक अहवाल नुकताच सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2009 ते 2019 या काळात सलग तीन वेळा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीमध्ये चांगलीच वाढ आहे. ही वाढ सरासरी 286 टक्के इतकी आहे. भाजप खासदार रमेश चंदप्पा यामध्ये आघाडीवर असून त्यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

मोठी बातमी! सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ( Association for democretic reforms) यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, सर्वाधिक संपत्ती वाढणाऱ्या पहिल्या दहा नेत्यांमध्ये ( Top 10 Politiciens) भाजपच्या सहा खासदारांचा समावेश आहे. बाकी नेते राष्ट्रवादी काँग्रेस, बीजू जनता दल, अकाली दल आणि AIDUF चे आहेत.

उर्फी जावेदच्या कपडद्याबद्दल अभिनेत्री अलका कुबल यांचे मोठे वक्तव्य; म्हणाल्या…

विशेष बाब म्हणजे संपत्ती वाढणाऱ्या नेत्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा सुद्धा समावेश आहे. सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये सुमारे 173 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2009 मध्ये सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती 51.53 कोटी रुपये इतकी होती. 2019 मध्ये यामध्ये 173 टक्क्यांची वाढ होऊन ती 140.88 कोटी रुपये एवढी झाली. मागच्या दहा वर्षात सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये तब्बल 89.35 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात अजित पवार यांचे मोठे विधान; म्हणाले…

सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा अहवाल खोटा आहे माझ्या संपत्तीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. हवं तर तुम्ही माझ्या संपत्तीची कागदपत्रं देखील तपासून पाहू शकता. ही माहिती खोटी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हंटले आहे.

अमूलनंतर आता ‘या’ दुधाच्या ब्रँडनेही केली दरवाढ

दरम्यान, अहवालात दिलेल्या माहितीप्रमाणे मागील दहा वर्षात, भाजपच्या खासदारांच्या संपत्तीमध्ये सर्वात जास्त म्हणजे सरासरी 42 पटीनं वाढ झाली आहे. या अहवालातील सर्वाधिक नेते भाजपचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे नेते आहेत. 2009 ते 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी खासदारांनी प्रतिज्ञापत्रे दाखल केली होती. या माहितीच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे.

ड्रायव्हर बनला रक्षक! चालकाने थेट चालू बसमधून उडी मारत वाचवले 34 जणांचे प्राण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *