शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित पठाण (Pathan) हा चित्रपट दोन दिवसापूर्वी रिलीज झाला आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते तो अखेर रिलीज झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून ‘पठान’ चित्रपटावरुन देशामध्ये मोठा राजकीय वाद सुरु आहे. अनेक वादानंतर अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
रशियाचा मुलगा महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळेत रमला! चक्क मराठीचे गिरवतोय धडे
या चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण ५७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. “हिंदी भाषेमधील चित्रपटाने ५५ कोटी रुपये कमावले तर डब केलेल्या चित्रपटाने २ कोटी रुपये कमावले. पहिल्याच दिवशी चित्रपटाने एकूण ५७ कोटी रुपये कमावले आहेत. याबाबत कोमल नाहटा यांनी ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे. सध्या या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे. यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे.
मोठी बातमी! अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शाहरुख खान भारताचा सुपरस्टार असून तो पठाण चित्रपटात खूप चांगला दिसतोय. दीपिका देखील छान दिसत आहे. त्याचबरोबर दीपिका आणि शाहरुख दोघे खूप छान दिसत आहेत. मला असं वाटतंय काही लोक शाहरुख खानवर जळतात”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.” त्यांनी एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती त्यावेळी त्या बोलत होत्या.