
राज्यात सत्ताधारी आणि विरोधक सतत एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसत आहेत. यामध्येच आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिवतारे यांनी केला आहे. आता यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सॅमसंगच्या ‘या’ लोकप्रिय फोल्डेबल फोनवर मिळवा 49 टक्केंची सूट! वाचा भन्नाट ऑफर
माझ्या वाचनामध्ये शिवतारे यांनी केलेल्या आरोपांवर अजून काही आलं नाही. मी सध्या संपूर्ण भागात पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे पाहत आहे. त्यामुळे ते काय बोलले आहेत मला माहित नाही. अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दहावीच्या परीक्षेत मुलाला कॉपी पुरवणाऱ्या बापाला पोलिसांनी केली बेदम मारहाण; व्हिडीओ होतोय व्हायरल
विजय शिवतारे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
याबाबत शिवतारे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. फेसबुकवर त्यांनी सुप्रिया सुळे यांचा व्हिडीओ शेअर करत म्हंटल की , “आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला” अशी पोस्ट शिवतारे यांनी केली आहे.