Site icon e लोकहित | Marathi News

Supriya Sule | शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा अचानक नाही! सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, “येत्या १५ दिवसांत…”

Supriya Sule | Sharad Pawar's retirement announcement is not sudden! Supriya Sule had said, "In the next 15 days..."

राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांत हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. दरम्यान कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. काल ( ता.२) लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी ही घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निवृत्त होऊ नये यासाठी भावनिक आवाहन केले आहे.

Uorfi Javed | उर्फी जावेदचा नवीन कारनामा पाहून डोकं चक्रावेल; पाहा Video

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी याआधीच याबाबतचा इशारा दिला होता. मध्यंतरी राज्यात अजित पवारांबाबत ( Ajit Pawar) उलटसुलट चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, येत्या १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट होणार आहेत. यातील एक स्फोट महाराष्ट्रात होईल तर दुसरा दिल्लीत! त्यावेळी या वक्तव्याचा कड्या अजित पवारांच्या भाजप प्रवेशासोबत जोडल्या गेल्या. मात्र शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेने राज्यात राजकीय स्फोट झाला आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी लिहिले स्वतःच्या रक्ताने पत्र!

एक स्फोट तर झाला! परंतु, सुप्रिया सुळे म्हणत असलेला दुसऱ्या राजकीय स्फोट कोणता? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. लवकरच शिवसेनेच्या ( Shivsena) सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयातून जाहीर होईल. यामुळे देखील अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे दुसरा स्फोट हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असू शकतो.

Sharad Pawar । शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर त्यांची बहीण भावुक…

Spread the love
Exit mobile version