Site icon e लोकहित | Marathi News

Supriya Sule । “..त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत नाही” सुप्रिया सुळे यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Supriya Sule

Supriya Sule । राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (Sharad Pawar group) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी चांदवडच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी सरकारच्या योजनांविषयी चर्चा करताना, राज्यातील आर्थिक अडचणी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.

Sanjay Raut । शिंदे पिता-पुत्रांबद्दल बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली..!

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका करत म्हटले की, “जिएसटी कौन्सीलच्या बैठकीत सहभागी होण्याचा अधिकार फक्त अर्थमंत्र्यांना असतो. पण राज्याचे अर्थमंत्री त्या मिटिंगला उपस्थित राहत नाहीत, त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचत नाही.” त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि यामुळे राज्याची स्थिती कशी वाईट होत आहे हे दाखवले.

Electric Vehicles Subsidie । मोठी घोषणा! इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी सरकार देणार एक लाख रुपयांपर्यंत सबसिडी

तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सुप्रिया सुळे यांनी गंभीर टीका केली. “देवेंद्रजी अभिमानाने सांगतात की त्यांनी दोन पक्ष फोडले, ही अभिमानाची गोष्ट आहे का? कॉपी करून पास होणारा व्यक्ती चांगला असतो का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या टीकेने फडणवीसांची कार्यप्रणाली आणि नेतृत्व क्षमतांवर प्रश्न उठवले.

Bjp । मोठी बातमी! राज्यात भाजपला मोठा धक्का!

सुप्रिया सुळे यांनी कांदा, सोयाबीन आणि कापसाच्या दरावर केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. त्यांनी आश्वासन दिले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच सर्वप्रथम शेतीविषयक वस्तूवरील जिएसटी रद्द करण्यात येईल, हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या भाषणाने चांदवडमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून, आगामी निवडणुकीसाठी त्यांनी या मुद्द्यांवर जोरदार काम करण्याचे संकेत दिले आहेत.

Vidhansabha Election 2024 । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार का? सस्पेन्स वाढला, काय होणार घोषणा?

Spread the love
Exit mobile version