Supriya Sule । सोशल मीडियावर इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा व्हिडीओ तूफान व्हायरल होते आहे. मतदारांना दमदाटी करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. सगळीकडे या व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भरणे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
मतदारांना भरणे यांनी दमदाटी केल्यांनतर बारामतीतील राजकारण चांगलाच तापलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्याला दमदाटी केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणाची दखल घेत थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
Narayan Rane । मतदानादरम्यान भाजप नेते नारायण राणेंचा मोठा दावा, म्हणाले…
रोहित पवारांनी केलं ट्विट
रोहित पवार यांनी भरणे यांचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!” असं ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
Palghar Politics News । शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का! बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश
केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा… pic.twitter.com/5ECFw7EnCx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024