Supriya Sule । राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षावर कोणाचे नियंत्रण राहणार? महाराष्ट्राच्या राजकारणात या सगळ्यात मोठ्या प्रश्नावर निवडणूक आयोगाचा निर्णय आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी (६ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या बाजूने निकाल देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मोठा झटका दिला आहे. यामुळे सगळीकडे याचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Rohit Pawar । निवडणूक आयोगाच्या निकालावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पक्षाचा बाप…”
माध्यमांशी संवाद साधत खासदार सुप्रिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘अदृश्यशक्ती त्यांचं हे यश आहे. कारण ज्या व्यक्तीने पक्ष स्थापन केला. त्यांचा हातातून पक्ष काढून घेणे अशी गोष्ट पहिल्यांदाच झाली असेल. मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण हे अपेक्षित होतं. हे महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘आज सुप्रीम कोर्टाची ऑर्डर पाहिली तर आमदारांच्या संख्येवरून पक्ष ठरत नाही. संघटना पक्ष ठरवते. त्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहोत, अशी माहिती देखील माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी दिली.