Supriya Sule । गौतम अदानी आणि शरद पवारांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांनी दिली मोठी प्रतिक्रिया!

Supriya Sule

Supriya Sule । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्योगपती गौतम आदमी यांच्यामध्ये काल गुरुवारी भेट झाली आहे. (Sharad Pawar Meet Gautam Adani ) अदानी आणि पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्याचबरोबर या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. अशा चर्चा सुरू होत्या आता याबाबत सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. (Politics News)

corona patients in Maharashtra । महारष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये वाढ; धक्कादायक आकडेवारी आली समोर

याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाला, “काल पवार साहेब खूप लोकांना भेटले आहेत. मात्र गौतम अदानी यांच्या भेटीबाबत मला काहीही माहिती नाही. अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे गट अदानी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहे आणि यामध्येच शरद पवार यांनी अदानी यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे.

Accident News । एका क्षणात झालं होत्याच नव्हतं, भरधाव डंपरची बहीण-भावाला धडक; संतप्त जमावाने पेटवला डंपर

रात्री उशिरा गौतम अदानी आणि आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या असं साम टीव्हीने वृत्त दिले आहे.

Sunil Kedar । मोठी बातमी! सुनील केदार यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार

Spread the love