Supriya Sule । सलमान खान (Salman Khan) याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. बाईक वरून दोन जण आले आणि गोळीबार केला असल्याची माहिती मिळत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे. आता यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Pune Crime । पुण्यात धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलीसोबत भयानक कृत्य
याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग लोकप्रिय आहे. तिथे काळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसेच भाजीवाले-दुधवाले तिथे येतात, त्यांच्या सुरक्षेचं काय? हे गृह खात्याचे अपयश असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सुपरस्टार सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील घराबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन राऊंड गोळीबार करण्यात आला. त्यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.