Supriya Sule । घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कमी होताच सुप्रिया सुळे कडाडल्या; केले सर्वात मोठे वक्तव्य

Supriya Sule

Supriya Sule । महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली असून त्यात त्यांनी सांगितले की, गॅस सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. पीएम मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीसांनी केली शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा!

या निर्णयाच्याबाबत शरद गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. LPG सिलिंडरच्या किंमती 100 रुपयांनी कमी झाल्याबद्दल NCP खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, ‘मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. वेळ पहा. गेली 9 वर्षे त्यांची सत्ता आहे. याचा विचार त्यांनी आधी का केला नाही? हे सर्व राजकारण आहे, मनापासून केले जात नाही. आमच्या सरकारमध्ये सिलिंडरची किंमत ४३० रुपये होती. ते का जुळत नाहीत?’ असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

LPG Cylinder Price । मोठी बातमी! महिलादिनी नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी केल्यानंतर तुम्हाला 800 रुपयांपर्यंत सिलिंडर मिळणार आहे. सरकारच्या घोषणेसह, या नवीन सिलिंडरच्या किमती देखील लागू होतील, याचा अर्थ तुम्ही आता बुक कराल त्या सिलिंडरसाठी तुम्हाला 100 रुपये कमी द्यावे लागतील.

Lok Sabha Election । अजित पवारांना मोठा धक्का! जवळचा माणूस घड्याळ सोडून तुतारी वाजवणार

Spread the love