Supriya Sule । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांच्या गाठीभेटी, पक्षांतर, जागावाटप, बैठका सुरूच आहेत. दरम्यान, आता सुप्रिया सुळे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रवीण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख आहेत. त्यामुळे प्रवीण माने आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीनंतर ते महायुतीत सोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यामुळे निवडणुका तोंडावर असताना सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसण्याच्या चर्चा सुरू आहेत.
Sharad Pawar । निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना बसणार सर्वात मोठा फटका!
त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने वेगळी भूमिका घेणार का? हे पाहणं देखील पुढील काळात महत्त्वाच ठरणार आहे. दोन दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी माने यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर प्रवीण माने आणि दशरथ माने हे अजित पवारांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Devendra Fadnavis । देवेंद्र फडणवीस यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “मला मोदीजींनी…”
मागच्या काही दिवसापासून प्रवीण माने आणि दशरथ माने हे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत आहेत. मात्र आता हे दोनही जण सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी हा मोठा धक्का बसणार आहे.
Bjp । धक्कादायक बातमी! पुण्यामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग