
Supriya Sule । पुणे : राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. अशातच आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी चक्क अजित पवार यांचे आभार मानले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest marathi news)
Lok Sabha Elections । ब्रेकिंग! महाराष्ट्रात जागांवर चर्चा नाही! एकनाथ शिंदे भाजप सोडणार का?
पुणे महानगरपालिकेच्या मल्टि सपेशालीटी हिलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने हे तिन्ही नेते एकत्र आले होते. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “380 कोटीचं उभं हॉस्पिटल राहतं आहे. शरद पवार (Sharad Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजितदादांच्या कामात कोणताही हस्तक्षेप केला नाही.हे आज अजितदादांच्या बोलण्याने स्पष्ट झालं. त्यामुळे अजितदादांचे मी आभार मानते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Manoj Jarange Patil । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटलांवर पुण्यात गुन्हा दाखल, समोर आलं मोठं कारण
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, “मला अजित दादांशी बोलण्याची संधीच मिळाली नाही, ते आले पण उशिरा आणि गेले लवकर. त्यांना काही गडबड असेल कारण ते बिझी लोकं आहेत, असा चिमटाही सुप्रिया सुळे यांनी यावेळी काढला. पण सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.