सुप्रिया सुळे मुंबईकरांना म्हणाल्या, “नुसतं घड्याळ बघू नका, तर घड्याळाचं…”

Supriya Sule told Mumbaikars, "Don't just look at the clock, watch the clock..."

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांना सलग सात वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. एक सक्रिय नेत्या म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. सोशल मीडियावर देखील त्या चांगल्याच सक्रिय असतात. त्यांना ज्या गोष्टी किंवा व्यक्तींचे कौतुक वाटेल त्यांच्याबद्दल त्या सोशल मीडियावर पोस्ट्स टाकत असतात. दरम्यान सध्या सुप्रिया सुळे त्यांनी केलेल्या अशाच एका कौतुकामुळे चर्चेत आहेत.

सलमान खान याच्याबद्दल ‘ही’ गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

नुकत्याच झालेल्या एका शिबिरात सुप्रिया सुळेंनी मुंबई ( Mumbai) शहराचे कौतुक केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काल (दि.21) घाटकोपर येथे एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रिया सुळेंनी मुंबई आणि मुंबईकरांबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. यावेळी त्यांनी चक्क एका गाण्याचे बोल म्हंटले आहेत. मुंबईने आजपर्यंत आपल्याला काय दिले? मुंबईचे आणि आपले नाते काय? यावर सुप्रिया सुळेंनी शिबिरा दरम्यान बातचित केली.

लोकसंख्या वाढीवरून अजितदादांच मिश्किल वक्तव्य; म्हणाले, “मूल जन्माला घालणं देवाची नव्हे तर नवरा-बायकोची…”

यावेळी त्यांनी त्यांच्या मुंबईतील आठवणींना उजाळा दिला आहे. हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान.. असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी आपला मुंबई विषयी असलेला जिव्हाळा बोलून दाखवला. ” मुंबईचा माणूस घडाळ्याकडेच बघत असतो. तो घडाळ्याच्या काट्यावर त्याच आयुष्य चालवत असतो. मात्र हाच परिणाम मुंबईकरांकडून पुढच्या निवडणुकीत दिसला पाहिजे. मुंबईकरांनी फक्त घडाळ्याला पाहायचं नाही तर घडाळ्याचं बटनही दाबायचं आहे.” असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

शरद पवार यांना मोठा धक्का; जवळच्या विश्वासू नेत्याची भाजपसोबत हात मिळवणी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *