
राज्यात सत्ताधारी आणि विरोधक सतत एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसत आहेत. यामध्येच आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेवाचं दर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिवतारे यांनी केला आहे.
याबाबत शिवतारे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. फेसबुकवर त्यांनी सुप्रिया सुळे यांचा व्हिडीओ शेअर करत म्हंटल की , “आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले. येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला||” अशी पोस्ट शिवतारे यांनी केली आहे.
शरद पवार यांनीच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, चंद्रशेखर बावनकुळे यांची जोरदार टीका
सध्या शिवतारे यांची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया करताना दिसत आहेत. आता शिवतारे यांच्या या आरोपामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दहावीच्या पेपरला शिक्षकांनी लिहिली थेट फळ्यावर उत्तरे! सामूहिक कॉपीचा गैरप्रकार उघडकीस