Baramati Lok Sabha । बारामतीत रंगणार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार सामना! भाजपच्या बड्या नेत्याने केली मोठी घोषणा

Baramati Lok Sabha

Baramati Lok Sabha । मागील काही दिवसांपासून बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चांना उधाण आले आहे. (Baramati Lok Sabha Constituency) पण, याबाबत अजूनही कोणतेही अधिकृत घोषणा झाली नाही. अशातच आता बारामती लोकसभेत यंदा सुनेत्रा पवार बाजी मारणार, असा महायुतीला विश्वास आहे,’ असं वक्तव्य भाजपच्या नेत्याने केले आहे. (Latest marathi news)

IPL 2024 । आयपीएल सुरु होण्यापूर्वीच ‘या’ टीमला मोठा धक्का! क्रिकेटपटूचा झाला भीषण बाईक अपघात

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार या लढणार असल्याचे सांगितले आहे. लोणावळ्यात “रन फॉर नेशन, रन फॉर मोदी” मॅरेथॉनला चित्रा वाघ यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्या बोलत होत्या. त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) असाच सामना रंगणार असल्याच्या चर्चांना पुन्हा बळ मिळाले आहे.

Uddhav Thackeray । “…तर आम्ही तुमच्यासोबत येऊ”, लोकसभेपूर्वी उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

दरम्यान, बारामती मतदारसंघातील उमेदवाराबाबत महायुती किंवा महाविकास आघाडीकडून अधिकृत कोणतेही घोषणा करण्यात आली नाही. तरीही सुप्रिया सुळे यांनी आपले व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवून आपली तुतारी निशाणी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला तर, सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार असणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून स्टेट्स ठेवले जात आहे.

Manoj Jarange Patil । मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम! ‘सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा, नाहीतर…. ‘

Spread the love