Supriya Sule । दर पाच वर्षांनी चेन्नई स्थित प्राईम पॉईंट फौंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे संसद महारत्न पुरस्कार (Parliament Maharatna Award) दिला जातो. हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्यांदा सुप्रिया सुळे यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यापूर्वी त्यांना १६ व्या लोकसभेतील कामगिरीसाठी सन्मानित केले होते. (Latest Marathi News)
VIDEO । तरुणीसह डान्स करणं होमगार्डच्या आलं अंगलट, घडलं असं काही की..
आता त्यांना १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पुरस्कार दिला जाणार आहे. सुप्रिया सुळे यांनी पाच डिसेंबरपर्यंत संसदेत ९४ टक्के उपस्थिती लावली आहे. त्यात त्यांनी २३१ चर्चासत्रांमध्ये भाग घेतला आहे. सभागृहात ५८७ प्रश्न विचारले आहेत आणि एकूण १६ विधेयके मांडली आहे. त्यांना आतापर्यंत सात वेळा संसदरत्न पुरस्कार (Sansadratn Award) प्रदान केला आहे. तसेच सर्वोत्तम कामगिरीसाठी विविध पुरस्कार मिळाले आहेत.
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची संकल्पना माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची आहे, अशी माहिती फाउंडेशनचे के श्रीनिवासन यांनी दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने विश्वासाने मला लोकसभेत पाठवलं आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सदैव कार्यरत राहील, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी पुरस्कार जाहीर झाल्यांनतर दिली आहे.
OBC । ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून नवीन योजनेची घोषणा