Supriya Sule । शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? मोदींच्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंनी दिले उत्तर; म्हणाल्या, “तुमच्या सरकारनेच…”

Supriya Sule

Supriya Sule । पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी शिर्डीतील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत वक्तव्य केले होते. आता त्यांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुळे म्हणाल्या की, मोदी सरकारनेच देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण हा पुरस्कार शरद पवार यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल दिला होता. राष्ट्रवादीच्या संस्थापकाचे शेतकऱ्यांसाठीचे योगदान कमी लेखू नये. असं त्या म्हणाल्या आहेत. (Latest Marathi News)

Israel Palestine । धक्कादायक! इस्रायली लष्कराने गाझामध्ये केले हवाई हल्ले, हमासने प्रत्युत्तर म्हणून रॉकेट…

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी अहमदनगर Ahmednagar) जिल्ह्यातील शिर्डी येथे सभा घेतली. यावेळी पीएम मोदींनी शरद पवार यांचे नाव न घेता म्हटले होते, “महाराष्ट्रातील काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले. महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने देशाचे कृषीमंत्री म्हणून काम केले. मी वैयक्तिकरित्या त्यांचा आदर करतो.” पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असे मोदींनी म्हंटले होते.

Raigad News । धक्कादायक बातमी! शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, मुलगा गंभीर जखमी; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

शरद पवार हे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये (2004-14) कृषिमंत्री होते. पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना शेतकरी मध्यस्थांच्या दयेवर होते, असेही मोदी म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “जेव्हाही पंतप्रधान महाराष्ट्रात येतात तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसला जन्मजात भ्रष्ट पक्ष म्हणतात.” खासदार सुळे म्हणाल्या, “पवार साहेबांना मोदी सरकारने शेती आणि राजकारणात केलेल्या कामाबद्दल पद्मविभूषण दिले होते.” असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

Maratha Reservation । मोठी बातमी! भाजप खासदाराच्या ताफ्यातील दोन गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या

Spread the love