सध्या राष्ट्रवादी नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याची चर्चा जोरदार रंगली आहे. नुकताच हा विवाहसोहळा पार पडला आहे. आता या विवाहसोहळ्यापेक्षा सुप्रिया सुळे आणि शिंदे गटाचे शंभुराज देसाई चर्चेत आले आहेत. सुप्रिया सुळे आणि शंभुराज देसाई यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! उरलेले आमदारही फुटणार?
सध्या राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याची शंभुराज देसाई यांनी उपस्थिती लावली. त्याचबरोबर या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शंभुराज देसाई यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोघे एकाच व्यासपीठावर येताच एकमेकांशी गप्पा मारत असल्याचे पाहायला मिळाले.
पाकिस्तानसह नेपाळ आणि बांगलादेशमध्ये दुधाला मिळतोय ‘इतका’ दर; वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
सुप्रिया सुळे यांनी शंभुराज देसाईच्या (Shumbhuraje Desai) कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर शंभुराज देसाई हसत होते. व्हिडिओमध्ये दिसतंय की, सुप्रिया सुळे शंभुराज देसाई यांच्या कानात काहीतरी कुजबुजल्या व देसाई हसायला लागले.