सध्या नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने ओव्हरटेक केल्यामुळे व्यक्तीने संतापून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही घटना भरचौकात घडली असू या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
एक दिव्यांग चाहता भर उन्हात फक्त परश्यासोबत फोटो काढण्यासाठी थांबला अन्…
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक पुरुष भर चौकात महिलेला मारहाण करताना दिसत आहे. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त करत. मारहाण करणाऱ्या पुरुषाला अटक करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवरून सुप्रिया सुळे यांनी देखील फडणवीसांना थेट सवाल केला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.
राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का ? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे. https://t.co/EG2PlmcB6J
— Supriya Sule (@supriya_sule) March 18, 2023
महिलेने ओव्हरटेक केल्याने व्यक्तीने तिला भरचौकात केली मारहाण; पाहा VIDEO
ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी लिहिले की, “राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का ? या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे.” असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.