
उर्फी जावेद व भाजप महिला आघाडीच्या नेत्या यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ ( Chitra Wagh) यांनी तिच्यावर आरोप केले असून रस्त्यात चोप दिला जाईल अशी धमकी देखील दिली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यामध्ये त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांना विनंती केली आहे.
“…तेव्हापासून मला संसदेत जाण्याची भीती वाटते”; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना जबरदस्त टोला
” सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेले गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवावेत. मी स्वतः माझ्या पक्षापासून सुरुवात करते. मागील अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरु आहे. ज्या राज्यात महिलांना माते समान सन्मान आहे, त्याच राज्यात हे घडत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली आहे.
गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
राज्यातील हे गलिच्छ राजकारण थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. अशी विनंती यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. प्रत्येकाच्या घरात मुली आहेत. त्यांना देखील मान- सन्मान आहे. म्हणून सुप्रिया सुळे यांनी ही भूमिका घेतली असून मागील काही दिवसांपासून संधी मिळेल तिथे आपण हेच सांगत आहोत. असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.