
Supriya Sule । अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. उमेदवार देखील निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांना तिकीट देण्यात आले आहे. बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) असा सामना रंगणार आहे. अशातच सुप्रिया सुळेंनी गंभीर आरोप केला आहे. (Latest marathi news)
नवी मुंबईमधील कोपरखैरणे येथे पुरंदर, भोर, मुळशी तालुक्यातील रहिवाशांचा मेळावा झाला. यावेळी सुप्रिया सुळेंनी महायुतीवर (Mahayuti) निशाणा साधला. “बारामती मतदारसंघात नागरिकांना धमकावण्याचे उद्योग सुरू आहेत. पण बारामतीतील स्वाभिमानी जनता अशा धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही कोणाला घाबरत नाही आणि गप्पही बसणार नाही. हा महाराष्ट्र सूडाचे राजकारण खपवून घेणार नाही,” असे सुप्रिया सुळेंनी मत व्यक्त केले.
Crime News । धक्कादायक! पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या तरुणीसोबत घडला अतिशय दुर्दैवी प्रकार
” राज्य सरकारने उन्हाळ्यातच वीज महाग केली. महागाई, बेरोजगारी, नागरिकांच्या समस्या या विषयांवर सरकार बोलायला तयार नाही. जे गेले त्यांना शुभेच्छा. त्यांच्याविषयी आपण काही बोलणार नाही. आम्ही रडणार नाही तर लढणार, नवीन ताकदीने पुन्हा उभे राहणार, असा निर्धार देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.