Supriya Sule । राज्यात शिवसेनेनंतर (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. पक्ष फुटीमुळे अजूनही भाजपला (BJP) विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. (Latest Marathi News)
Ajit Pawar । राष्ट्रवादी कोणाची? अजित पवार स्पष्टच बोलले, म्हणाले; “निवडणूक आयोग…”
“भाजपाचं नेतृत्व पक्ष फोडणं, घरं फोडणं त्यासाठी इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा वापर करण्यात खूप मग्न असतात, त्यामुळे त्यांना बदल करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी कसलाच वेळ नसतो. जर देवेंद्र फडणवीस यांनी सगळा वेळ घरं फोडणं आणि पक्ष फोडण्याकडे न देता विकासाला वेळ दिला असता तर ही वेळ आली नसती”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
Tomato Subsidy । टोमॅटोला अनुदान जाहीर करा! शेतकऱ्यांची मोठी मागणी
ज्यावेळी जालन्यात सुना, लेकी आणि मुलांवर हल्ला झाला त्यावेळी देवेंद्र फडणवीस प्रचाराला गेले होते. नागपूरमध्ये (Nagpur) त्यांची गाडी अडवली गेली, या कृतीचं मी समर्थन करणार नाही. जरी ते माझे राजकीय विरोधक असले तरीही जेव्हा ते तुम्हाला भेटायला येतात, तेव्हा अशा गोष्टी होणं उचित नाही. सगळ्यांनी एकत्र येत नागपूरची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत केली पाहिजे,” असे आवाहनही सुळेंनी केले आहे.
Mobile Addiction । धक्कादायक! शहरातील 61 टक्के लहान मुलांना लागलंय मोबाइलचं व्यसन