Supriya Sule । राखी पौर्णिमा हा सण अगदी जवळ आला आहे, ज्यावर भाऊ-बहिणीच्या नात्याचं महत्त्व अधोरेखित होतं. या पार्श्वभूमीवर, सुप्रिया सुळे यांना अजित पवारांना राखी बांधणार का, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. जुलै २०२३ पासून अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या मतभेदांमुळे दोघांच्या नात्यावर परिणाम झाला आहे.
Satara Accident News । साताऱ्यातील भीषण अपघातात बस आणि दुचाकी जळून खाक, तरुणाचा मृत्यू
अजित पवारांनी नुकतेच त्यांच्या निर्णयाबद्दल खंत व्यक्त केली आहे. त्यांनी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्रा उभी करण्याचा निर्णय घेण्याची चूक मान्य केली आणि म्हणाले की, “सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारणाच्या ठिकाणी असले तरी बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. राजकारण घरात शिरु द्यायचं नसतं.” असं अजित पवार म्हणाले होते.
Ladki Bahin Yojna । आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास झाली सुरवात!
दरम्यान सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी अजित पवारांना राखी बांधणार का? असे विचारल्यावर ‘कळेल’ असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले. त्याचप्रमाणे, रक्षाबंधनाच्या दिवशी त्या नाशिक दौऱ्यावर असतील, असेही त्यांनी सांगितले. अजित पवारांनी शरद पवार यांना फोन केला का, याबद्दल विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, त्यांना फोन आलेला नाही.
Independence Day 2024 । लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी तरुणांसाठी केली सर्वात मोठी घोषणा