Maharashtra politics । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha election) रणधुमाळी सुरु आहे. अनेक पक्ष त्यांच्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. अशातच लोकसभेचं तिकीट जाहीर होताच शरद पवार गटाचा शिलेदार अडचणीत सापडला आहे. (Latest marathi news)
Sharad Pawar । राजकारणातून मोठी बातमी! शरद पवारांचा मोठा गेम
भिवंडी लोकसभा मतदासंघासाठी (Bhiwandi Lok Sabha Constituency) सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाई केली जाणार आहे. लवकरच येवई येथील आर के लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीए कारवाई केली जाईल. त्यामुळे लोकसभेपूर्वीच सुरेश म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! नाशिकमध्ये येणार राजकीय भूकंप? अखेर तो दिवस आलाच
यावर सुरेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले असून त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत. गोदाम व्यवसायातून 90 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. तालुक्यातील अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टाचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत,” असा आरोपही सुरेश म्हात्रे यांनी केला आहे.
Muralidhar Mohol । मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’, आखली विशेष रणनीती